१ नाताळाचा दिन हा !

मराठी

१ नाताळाचा दिन हा ! जगी हर्ष हा महा ! ख्रिस्त जन्मला पहा कुमारी मार्योदरीं घेई देहा २ जनोद्धार व्हावया मूर्तिमंत ही दया घेई जन्म जगीं या तयाच येशू बाळासि भजूं या ३ फुलें बरीं आणवा देवळें ती शोभवा आज मुक्‍ति मानवा आणी जो मार्यापुत्र त्यासि स्तवा ४ आज ख्रिस्त जन्मदिन, गा हो सर्व ख्रिस्तीजन, साजरा करुं या सण देही जो देव त्याचें करुं पूजन