निर्मिल्या तुवा तारका,

मराठी

निर्मिल्या तुवा तारका, जनदीपा शाश्‍वतिका, येशो, ऐक उद्धारका, होई प्रसन्न सेवका, शापित सृष्टि रडता, ऐकूनी आलासी स्वता, स्वये करुनी योजना, तारीले तू नष्ट जनां, पृथ्वीचा जणो असतां संध्यासमय, तू ख्रिस्ता, वरासम गृहातूनी येशी कन्योदरांतूनी तयाचि नामा संप्रती भूस्वर्गी शिरे लवती, गुडघे सारे टेकीती, अनन्य राजा मानीती न्यायेश होऊनी येशी घोर न्यायाच्या दिवशी, रक्षी आम्हां तया दिनी, आताही, शत्रूंपासूनी देवपित्या, देवसुता, सदात्म्या, देवा अनंता, असो शंसा, मान, स्तुती युगानुयुगी, सांप्रती