१ पतिता, ये, चल शुचि व्हायाला,

मराठी

१ पतिता, ये, चल शुचि व्हायाला, प्रभु येशुपदास धरीं, अघसिंधूमधुनि तरायाला प्रभु येशुकृपाच तरी ध्रु. प्रभुच्या.. प्रभुच्या.. प्रभुच्या धर वंद्य पदा जगदुद्धारक गुरूराजाच्या न दुजा पथ मुक्तिपदा २ प्रभु येशू क्षितीवरि आला या, बघ तोचि समर्थ सखा, अघपाशा झडकरी तोडाया तुज देईल नित्य सुखा ३ म्हणवी तो पतितसखा, देई अघमुक्ति विनम्र जनां म्हणुनी तूं शरण तया जाई, प्रभु देईल शांति मना ४ मनुजांच्या हरि अवघ्या तापा प्रणतीं करूणा करितो, प्रभुपाशीं चल त्यजुनी पापा शरणगततारक तो