परमेशाला स्तवा, निरंतर,

मराठी

परमेशाला स्तवा, निरंतर, परमेशाला स्तवा- ध्रु नित्य तयाच्या पवित्र स्थानीं जाउन त्याला स्तवा सामर्थ्याचा प्रसर तयाचा आणुन ध्यानीं स्तवा वर्णा त्याचे प्रताप महती गाउन त्याला स्तवा करणा, वीणा, सतार घेऊन जगदीशाला स्तवा वाजवुनीयां मृदुंग, करुनी नर्तन त्याला स्तवा तंत्रयंत्रवाद्यांच्या नादें विश्वपतीला स्तवा मंजुध्वनीच्या उंचध्वनींच्या झांजांवर त्या स्तवा प्राणिमात्र हो, स्तवा परेशा, परमेशाला स्तवा