पवित्रात्मन्, अनाद्यन्ता,

मराठी

पवित्रात्मन्, अनाद्यन्ता, अनाविद्धा, तुझी सत्ता समर्था, तूं जगद्वंद्या, जगा आधीं जगद्‍ध्याता- ध्रु जगन्नेत्या, तुझी स्फूर्ती, जगाचें हेंच चैतन्य न ती जेथें तिथें सारें सदा मेलें ! सदा शून्य तुला सप्रेम अर्पितों, जिवा देहा अगा नाथा करीं सारें विभो तूं, मी निमित्ताचा धनी आतां कृपा सर्वावरी तुझी जरी कोणी म्हणे नाही, तरी तो मात्र सोडोनी, तिला पापी दुरी राही असा पापी जगीं मी हें पुरें ठाऊक मच्चिता कसें चोरुन ठेवूं हे ? पुढें सर्वान्तरज्ञाता ! जसा आहें तसा आलों, रित्या पात्रास घे घे या कुठें छिद्रें जरी याला, तरी तूं सिद्ध सांधाया स्वयें आरंभिल्या कार्या करी संपूर्ण तूं ताता ! नसे झाला न वा होणें तुझ्या ऐसा कधीं दाता