१ पहा ! येतो मेघावरीं

मराठी

१ पहा ! येतो मेघावरीं वधलेला कोंकरा लाखो संत त्याची स्वारी स्तविती परात्परा हालेलूया ! ख्रिस्त येतो माघारा २ प्रतिनेत्र त्याला पाहील, तेजस्वी तो भयंकर विकणारे दु:खी होतील, वधणारे क्रुसावर अति शोकें ख्रिस्त पहाती सत्त्वर ३ त्याची दु:खचिन्हें प्रिय अंग दावितें अजून, क्षेम तीं अगणनीय त्रात भक्‍तां त्याकडून किती हर्षे पाहूं वण निरखून ४ हां, आमेन ! सर्व वंदोत तुला आसनीं वरील तुला बल, मान असोत, राज्य सर्व जगांतील हालेलूया ! तूंचि राज्य करिशील