ह्या वधूवरांना आशीर्वचना द्यावें,

मराठी

ह्या वधूवरांना आशीर्वचना द्यावें, हे दयानिधें, तूं ह्यांना सांभाळावें- ध्रु तूं विवाहविधी हा प्रेमें संस्थापीला, हे परमपवित्रा पवित्र तूं हा केला ह्या वधूवरांनीं दिव्य हेतु जो ह्याचा तुज दावावा तो करुन, दयाळा, साचा आज ही प्रेमरज्जुंनीं, बांधिलीं, एक हीं मनें बा दोन्हीं, जाहलीं तुजपुढें पती कीं पत्नी, शोभलीं तुज गृहांत ह्यांनीं मनीं प्रतिष्ठापावें, हें कृपादान तूं वधूवरां पुरवावें जशि देहीं बुद्धी, गृहीं तशी ही गृहिणी, गृहराज्यावरची धन्य मान्य ही राणी हा पती देहिंचा प्राण तसा निजगेहीं सुखदायक होवुत परस्परां उभयें हीं नववधूवरां राखाया, यांजला सांगण्या रोज शिकवाया, यांजला निर्मला ख्रिस्तप्रभुराया, प्रेमला, तूं ह्यांचें गृह तें अपुलें मानुन घ्यावें, हें गृह ख्रिस्ताचे असेंच लोकीं व्हावें हा संसाराचा मार्ग सारखा नाहीं, हा कुठें सुखद, हा कुठें व्याप्त विघ्नांही निर्गर्व सुखीं ह्यां ठेव संकटीं शांत, सुखदु:खी ह्यांचा त्यजूं नको तूं हात फूलल्या प्रेमवृक्षाला, ईश्वरा, मधु फळें येउं दे याला, ईश्वरा घेउं दे स्वाद आम्हांला, ईश्वरा चिरकाल दंपती करोत तुझिये सेवे, जग म्हणो निवडिलें कुटुंब अपुलें देवें