१ पाया एक्लेसियेचा

मराठी

१ पाया एक्लेसियेचा प्रभु येशू राणा उद्भव हो तियेचा जलें, शब्दें जाणा वरुनि तोचि आला तिला विवाहाया, तो तिजसाठी मेला स्वरक्तें खंडाया २ राष्ट्रांराष्ट्रांतूनि ती वेंचली तरी एक, सनद उद्धाराची, निष्ठा, प्रभुही एक ती वंदी नामा एका, एकान्ना सेवूनी आशेने चाले एका, कृपाही पावूनी ३ तिरस्कारानें तीतें, मनुष्यें पाहतीं, फुटी, पखंडें यांतें, कंटाळे भारी ती, तरी सदा सद्भक्त प्रभूला प्रार्थिती ती शोकरात्र जातां हर्षेल प्रभातीं ४ जगाच्या संग्रामांत आशेनें राहे ती, त्र्येकाच्या ती ऐक्यांत आनदें वसती गुरु, तू आम्हां नेई सद्भक्तासंगतीं अनंतकाळी देई स्वर्गात विश्रांती