१ पाहा! क्रूसझेंडा पुढें चालला

मराठी

१ पाहा! क्रूसझेंडा पुढें चालला ख्रिस्ती सैनिकांनो, चला हो चला सरदार ख्रिस्त पुढें असतां वैर्‍यांमध्ये गेला त्याचा बावटा ध्रु. पाहा ! क्रूसझेंडा पुढें चालला ख्रिस्ती सैनिकांनो, चला हो चला २ जयध्वजामुळें धाक वाटतो, सैतानाचा मेळा पळूं लागतो घोष ऐकुनीया दुष्ट कांपतो करा हो आरोळी जय मीळतो ३ थोर फौजरुपी ख्रिस्ती मंडळी शत्रू जिंकायाला झुंजू लागली एक प्रभु आहे, बंधु हो आम्ही ऐक्यता असावीं मेळ नेहमी ४ गळतातीं राज्यें पिकल्यापरी, वाढे ख्रिस्तसत्ता सर्वदा तरी बळ नरकाचें नची चालतें वचन ख्रिस्ताचें ठाम राहतें ५ तर सैनिकांनो, पुढें व्हा, चला आमूच्या संगतीं लागा गायाला संतांनो, दूतांनो, त्या सर्वोत्तमा सुवंदित म्हणा, वंदा महिमा