पाहिला का प्रभु ख्रिस्त

मराठी

पाहिला का प्रभु ख्रिस्त खिळलेला खांबावरी ? पाहिले का खिळे उरीं, पदीं, दयापूर्ण करीं ?- ध्रु पाहिला का कंटकांचा मुकुट रूतलेला शिरीं ? पाहिलें का घळाघळां रक्त गळें भूमिवरी ? पाहिलें का कोण त्याचीं क्षतें खोल खोल करी ? पाहिलें का कोण पापी डाग देई दु:खावरी ? पाहिलें का तारावया कवणा तो दु:ख वरी ? पाहिलें का कोणाकडे प्रेमभरें पाहि तरी ? पाहिली का प्रीती अशी जगीं कधीं स्वप्निं तरी ? वाहिलें का सर्व जिणें तुवां त्याच्या पदांवरी ?