पुष्कळ अजुनी उणा, प्रभू, मी

मराठी

पुष्कळ अजुनी उणा, प्रभू, मी पुष्कळ अजुनी उणा रे- ध्रु खंडींतुन रति नाहिं फेडिलें, बंधुभगिनिंच्या ऋणा रे तुझा ऋणी तर सदाच राहिन, अगा पतितपावना रे किती लाजतों मनांत ठाऊक, तुजवांचुन हें कुणा रे ? असें करावें, तसें करावें, वायां मम वल्गणा रे टाकाऊ मी परंतु, सदया, आवडलों त्वन्मना रे ! असा पाहिजे तुला तसा मी करुं कसा आपणा रे ? ख्रिस्ता, ख्रिस्ता, घे घे अवघा, हा माझा मीपणा रे !