१ पूर्वी दाविदाच्या गांवीं

मराठी

१ पूर्वी दाविदाच्या गांवीं गोठा, बैल दिसले, तेथें आईनें गव्हाणीं प्रिय बाळ ठेविलें माता ती मरीया दीन, येशू ख्रिस्त बाळ लीन, २ स्वर्गाहूनि पृथ्वीवरी आला देव भगवान गोठा मात्र त्याचा आश्रय पाळणा गव्हाणीं जाण नम्र दीन यांसहित त्राता राहिला पृथ्वींत ३ हो आश्चर्य ! बाळपणीं मान देई आईला, पडे शांत अंकावरी प्रेमें पाही तिजला ख्रिस्ती मुलें सगळीं तैसीं व्हावीं चांगलीं ४ तोची लेंकरांना कित्ता, बाळापरि वाढला तान्हुला, लहान होता, रडला व हंसला सारें दु:ख जाणे तो, बाळांसंगें हर्षतो ५ अंतीं आम्ही त्याच्या प्रेमें त्याला पाहूं वैभवीं, असे बाल सौम्य, प्रिय, राजा स्वर्गी गौरवी तेथें दिव्य वैभवीं, आपुल्या मुलां नेई ६ पुन्हां कधिंही गव्हाणीं आम्हां तो न दिसणार परी आसनीं पित्याच्या पाहूं त्या प्रमोदें फार तेथें बाळें तेजोमय त्याला सेविती अक्षय