१ प्रभुच वाट दाखवी,

मराठी

१ प्रभुच वाट दाखवी, स्वतां मला तो चालवी, सुचे मना जैं हा विचार तैं वाटे समाधान फार ध्रु. तो चालवीं, तो चालवी, मला स्वहस्तें चालवी, मी त्याला मान्य सर्वस्वी प्रभूच स्वता चालवी २ कधीं हर्षाच्या समयीं, कधीं क्लेशांच्या प्रलयीं सुखांत कीं, दु:खांत मी, तो चालवितो नेहमीं ३ मी हात त्याचा धरितों, संतुष्ट आतां राहतो, तो हर्षवी कीं दुखवी, तरी प्रेमानें चालवी ४ संपेल जेव्हां माझी धांव, जैं होई माझा पूर्ण भाव, तैं मृत्युतीरीं न भीणार प्रभूच चालवील पार