१ प्रभुची प्रीती पतितांवरी

मराठी

१ प्रभुची प्रीती पतितांवरी शास्त्रांत वर्णिली पाहा खरी, तेथें आढळलि सुवार्ता ही, ख्रिस्त हा तारील मजलाही ध्रु. आतां सदा आनंदीत मी, मजलाही ख्रिस्त तारी आतां सदा आनंदित मीं, सुवंद्य प्रीति ती २ मज लाचारास उध्दराया, प्रेमें तो आला जगीं राहाया, प्रेमेंच क्रूशीं प्रभु टांगला, म्हणून तो अति प्रिय मला ३ प्रिय ख्रिस्ता कधी विसरतों तरी तो मला नचि सोडीतो ही अनिवार प्रीति स्मरुनी शरण जातों त्या मी रडुनी ४ कशी ती प्रीति कळे तुजला ? कोणी विचारी जरी मजला, तरी सदात्मा बोले अंतरी, तुजवरी ख्रिस्त प्रीति करी ५ ह्या विश्वासांत समाधान फार, ख्रिस्त मला कधीं न टाकणार, सैतानसत्ता नाहींशी होती जेव्हां मी वर्णी ख्रिस्ताची प्रीति ६ आहा ! मी स्वर्गासीं जाईन वर, पाहीन जेव्हां तो राजा सुंदर, तेव्हां गाईन दूतांसंगतीं ख्रिस्ताची अपरिमित प्रीती