प्रभुपद दृढ धर

मराठी

प्रभुपद दृढ धर धर रे मना ! धर रे मना ! बा धर रे मना !- ध्रु ऐक ऐक नाहिं तर, श्रमुनियां जन्मभर अंतिं तूंच साधिशील आत्महनना स्वप्नमुग्ध समजुन, स्वप्न हेंच जागेपण, किती वेळ मांडिशील हास्यरुदना ! प्रभुवीण सोय नसे, तुझें तूजलाहि दिसे, तरि कां रे शुद्धिवरीं अजुन येशिना ?