१ प्रभु ख्रिस्ता, तूं कृपेनें

मराठी

१ प्रभु ख्रिस्ता, तूं कृपेनें लग्ननेम लाविला घेऊनी आतां दयेनें आशीर्वाद दे आम्हां वधूवरां या दोघांना तुझी कृपा दाखवी, क्षेम दे उभयतांना तें अखंड वाढवीं २ तुझी कृपा पावतांना हीं वंदोत तुझें नांव, सुमार्गात चालतांना दाखवोत प्रेमभाव, प्रिय प्रभु, तूं दयाळू करीं यांची बेगमी, दे आरोग्य, हे कृपाळू दु:खें वारी नेहमीं ३ रोज रोज यांच्या घरीं स्तुति भक्‍ती होवो फार, तुझी कृपा झाली तरी हीं मानोत उपकार, भवदु:खें लागतांना करी यांचा तूं निभाव हीं आधार मागतांना वेगें होऊं दे बचाव ४ अंत:काळीं बोलावूनी यांचा करिशी वियोग, तेव्हां पुन्हां मिळवूनी वरी दे सत्सुखभोग प्रिय प्रभु ममताळू, दे भक्‍तीची भावना, स्तवु तूला, दे दयाळू, गाऊं तूझी करुणा