१ बाळ जन्मलें आज,

मराठी

१ बाळ जन्मलें आज, बाळ हें नामांकित, राजवेत्र व मुकुट योग्य तया खचित ध्रु. शुभवार्ता सर्वांस, सांगावीं मोदें आज, धन्य नाताळदिनीं जन्मे राजाधिराज २ मेंढरें राखितां मेंढक्यांनीं हें वृत्त दूतमुखें ऐकिली रात्रीं त्याच समस्त ३ दूत होता बोलत तों सेना पातली परात्परापासुनी तेजस्वी, त्या स्थलीं ४ प्रभु देवा स्तुती, स्वर्गीय राजाही, ती पारादैसीं असों गातसे सेना ही ५ असो सर्व गौरव, आसनीं परात्पर, स्तुति, जयश्री, देवा गान-घोष सुस्वर