भक्तीचि वेळ, भक्तीचि वेळ !

मराठी

१. भक्तीचि वेळ, भक्तीचि वेळ ! मला सदैव आवडेल, मी टाकिं चिंता सगळी व जाई बापाजवळी ती संकटाच्या समयीं देईल शक्ती हृदयीं, तै मोहपाशही टळेल, अमोल ती भक्तीचि वेळ ! २. भक्तीचि वेळ, भक्तीचि वेळ ! ही गोड कैशि वर्णवेल ? करी मला ती प्रेरणा, देव मी, अर्पि प्रार्थना त्या ठायिं भाव ठेवुनी व भार सर्व टाकुनी कृपा अनंत तैं मिळेल ही धन्य हो भक्तीचि वेळ ! ३. भक्तीचि वेळ, भक्तीचि वेळ जिवा आधारही लाभेल देहांतुनी सुटूनियां जाई वरीं चढूनियां पवित्र होति भावना, समाप्त सर्व प्रार्थना, तैं जयकार हो गर्जेल सफळ ही भक्तीचि वेळ