१ भूप पौरस्त्य दुरुन

मराठी

१ भूप पौरस्त्य दुरुन आलों तिघे भेटी घेऊन, देश धुंडीत, वाट कंठीत, तार्‍या अनुसरुन ध्रु. हे तार्‍या, दिव्य तेजस्वी तारांगण, भूपवी पश्चिमेसी, नीट नेसी सत्प्रभा भेटवी मेल्खिओर: २ बेथ्लेहेमी राजा जनित तो अक्षय तक्‍ताभिषिक्‍त व्हावा म्हणून, सोनें आणून करी मी समर्पित कास्पर: ३ ऊद असे मजजवळ अर्पिती तो देवा केवळ, स्तुति, पूजन, तरी हो जन ! यालाचि द्या सकल बल्थजर: ४ माझा कडूबोळ सूचित, करी, भावी जिणें क्लेशित, दु:ख, पीडन, रक्‍त, मरण, शवगर्ता मुद्रित ५ परि आहे तो जीवंत राजा, देव, बलि, सांप्रत हालेलूया, हालेलूया, भू वदे स्वर्गाप्रत