मज अंगिकारीं, हे ताता

मराठी

मज अंगिकारीं, हे ताता तुज शरण आलों मी आतां- ध्रु विरुद्ध नभाच्या, समक्ष तुझ्या मी केलें पातक, तूं बा दाता तव पुत्रा मी हें म्हणणें उचित ना, दासासम मज ठेविं नाथा तनु काष्ठ झाली, वस्त्रेंहि चिंध्या ठेवितों तव चरणिं माथा अक्षम्य पापें केलीं खचित मी दुसरा तुजनिण कोण त्राता