मराठी
मधुर अशी ऐका ललकारी
येणार प्रभु करा तयारी- ध्रु
विसरा स्वप्नें अंधराचीं
तुम्ही बालकें सुखद दिनाचीं
ग्वाही प्रभुच्या आगमनाची
ऐकुन त्याला जा सामोरी
नितिभानु तों नाशि तमाला
नवचैतन्य देईल सकलां
मुक्तीचा नजराणा दिधला
करि तो मनिषा सफल सारी
भयभीत जगीं पुनरपि येइल
भक्तां अपुल्या जवळीं घेइल
पांखर प्रभुजी प्रेमें घालिल
वैभवशाली तो, जन तारीं
पितया, पुत्रा, परमात्म्याला
धन्यवाद द्या गौरव त्याला
सदासिद्ध त्या धन्य त्रयाला
तोच जगाचा अघतम वारी