मन असावे वाटते

मराठी

मन असावे वाटते धौत ख्रिस्तरक्ते, पापमुक्त, निर्बंध, ते स्तवाया देवाते मन ज्यामध्ये अक्षयी श्रीख्रिस्त विराजे, मन अंकित विनयी, ख्रिस्ताला वश जे मन नम्र पापे खिन्न, श्रद्धालु तत्पदी, मृत्यु जीवनेही भिन्न होईना जे कधी मन नवीकृत, शुद्ध वरी जे उत्तमा, खरे, पूर्ण, प्रीतिबद्ध तुझीच प्रतिमा येई कृपावंता राही नित्य मंदतरी, शुद्ध ते करुनी लिही स्वनाम त्यावरी