मागी जन जाती, ज्ञानी- ध्रु

मराठी

मागी जन जाती, ज्ञानी- ध्रु यहुदी नृप तो कुठें जन्मला जनांस ते पुसती पूर्व प्रदेशीं तारा पाहुन करिति तया प्रणती बाळ पहाया तेथून गेले तारा त्यांपुढतीं होतें जेथें बालक तेथें ताराही वरतीं गृहात गेलें, बाळ पाहिलें, नमन तया करिती धन, सोनें, मध, ऊद, तयातें मग ते अर्पिती