यहुदी राजाची, हो

मराठी

यहुदी राजाची, हो दाविदपुत्राची स्वारी थाटांत आली माझ्या गांवांत नासोरी येशूची प्रभुच्या नामानें, हो येई मानानें यरुशलेम भेट घेई सत्प्रेम राजांच्या राजाची सियोनेच्या कन्या, हो खरोखरी धन्या भेटावयास राजा येई तुम्हांस स्वारी ही नवलाची वस्त्रें तव भारी वाटेवर पसरी होसान्ना गान गाई तया महान शोभा ये नगराची हंसती फुलवेली नगरी बघ सजली डुले डौलांत कशी हिरवी हातांत झांवळी खजुरीची