१ याहो, सद्‍भक्‍तांनो

मराठी

१ याहो, सद्‍भक्‍तांनो हर्षा जयोत्साहें याहो, याहो बेथ्लेहेमीं तुम्ही या जन्मला पहा दूतंचा हो राजा याहो, तयाला वंदूं, याहो, तयाला वंदूं, याहो, तयाला वंदूं, ख्रिस्त थोर २ देव देवापासून ज्योतींतील ज्योती परी न धिक्कारी कुमार्‍युदर देवचि जनित, जरी तो असृष्ट याहो, तयाला वंदूं..... ३ गा हो, दूतसैन्यें, उल्हासानें गा हो, गा हो दिव्यलोकवासी सर्व जन अत्युच्चलोकीं गौरव देवाला याहो, तयाला वंदूं.... ४ नमितों हे प्रभो आजि जन्मलेल्या, येशू तुझे होवो सर्वत्र गौरव शब्द पित्याचा देहधारी होई याहो, तयाला वंदूं....