१ येई, पवित्रात्मन्, येई,

मराठी

१ येई, पवित्रात्मन्, येई, राहीं तूं आमुच्या ठायीं तुवां निर्मिल्या अंतरीं दिव्य अनुग्रह भरीं २ स्वर्गीय अभ्यंगकर्त्या संबोधका, दानदात्या, प्रेमाग्रे जगज्जीवना, ऐक आमुची प्रार्थना ३ तूं ईशहस्ततर्जनी, तुझीं दानें सप्तगुणी ईशवचन तूं स्वतां, भिन्नभाषाज्ञानदाता ४ प्रकाशी तूं पंचेंद्रियें, प्रेमें भरीं हीं हृदयें, दुर्बलां शक्ति अक्षय्यी देई तुझी या समयीं ५ आत्मिक शत्रु घालवीं, अढळ शांती पुरवी, तूं आम्हां मार्ग दावितां अनिष्टांची नुरे चिंता ६ पिता पुत्र या दोघांचें आम्हां देई ज्ञान साचें, तू उभयतांपासुनी निघशी, ही श्रद्धा मनीं ७ पिता पुत्र यांच्यासंगें सदात्मा स्तवूं अवघे, दानें त्याचीं आम्हांवरीं पुत्र वर्षो निरंतरी