१ येई, येई इम्मानुएल

मराठी

१ येई, येई इम्मानुएल सोडीव बद्ध इस्त्राएल येथे बंदींत कण्हती तुझी प्रतीक्षा करिती हो इस्त्राएल्‌ ! करा उल्हास इम्मानुएल येईल खास २ ये रे इशायाकोंबा थोर मोडी सातानसत्ता घोर निवारी नरकाचें भय आम्हां दे थड्यावरी जय हो इस्त्राएल्‌; करा उल्हास इम्मानुएल्‌ येईल खास ३ ये तूं, उदयप्रभे, ये शांतवी दासहृदयें, रात्रीचे ढग घालवी, मृत्यूच्या छाया पळवी हो इस्त्राएल्‌; करा उल्हास इम्मानुएल्‌ येईल खास ४ ये दाविदाच्या किल्ली, तार, वेगे उघडि स्वर्गद्वार सन्मार्गी तूं आम्हां चालीव, कुमर्गापासूनि वळीव हो इस्त्राएल्‌ ! करा उल्हास इम्मानुएल्‌ येईल खास ५ येरे, प्रभो, तूं शक्‍तिमान प्राचीन कालीं आज्ञादान स्वलोकां दिलें डोंगरीं समेघतेज ईश्वरी हो इस्त्राएल्‌ ! करा उल्हास इम्मानुएल्‌ येईल खास