येतां येतां का ?

मराठी

येतां येतां का ? बेथलहेमा येतां का ? दूतांसंगें जयजयकारें गगना भरितां का ?- ध्रु तन्मय झाला का ? अपणा आपण भुललां का ? ह्या बाळाची ओळख पटुनी ईश्वर दिसला का ? हृदयीं भरला का ? जिकडे तिकडे उरला का ? ख्रिस्तच माझें जीवन अक्षय निश्चय झाला का ? याहो, गातां का ? हर्षे नर्तन करितां का ? ख्रिस्तजयंतीं रोज यापुढें ऐसें गणितां का ?