१ येशू प्रिय तारका,

मराठी

१ येशू प्रिय तारका, आश्रयाच्या खडका, वारा सुटे भोंवतीं, लाटाही उसळती येशू हो मला आधार, सारीं संकटें निवार, पैलपार पोंचवीं जागा द्यावी पोंचवीं २ नाहीं थारा पामरा, तूंची देशी आसरा, आश्रिता न घालवी, पाठीला न फिरवीं, माझी आशा सगळी, तुझ्याठायीं ठेंविली पंखांखालीं सर्वकाळ करी माझा प्रतिपाळ ३ येशू, कृपा मागतों, तुझे पाय धरितों, दीन, रोगी, अंधळा, असा झालों खंगला तूंचि पूर्ण सत्यता, तूं मात्र पवित्रता मी किती अनीतिमान, पातकांनी लिप्त जाण ४ तूझी कृपा अतिशय, क्षमा करी, हो सहाय प्रभू, मला शुद्ध कर, दे सदात्मा जन्मभर जीवनाच्या उगमा, मोठा तुझा महिमा, माझ्यामध्यें वस्ती कर तेथें सदा सत्ता धर