१ येशूची सेवा आवडे

मराठी

१ येशूची सेवा आवडे गेलों सुवेळीं त्याकडे तो दावी फार करुणा माझ्यांत तोष मावेना ध्रु. धन्य वार, धन्य वार ! जैं सारा गेला पापभार सतत आतां प्रार्थना, स्तुती आनंद सरेना धन्य वार, धन्य वार ! प्रभूने केला जै उद्धार २ केला करार निश्चयें, दिलीं प्रभूनें अभयें अंदेशा कां आतां, जीवा ? विसांवा घे, जा गौरवा ३ तो राहूं देई जवळी नित्यानें तोचि सांभाळी, सुखद स्वर्गी आणुनी ठेवील तो स्वसदनीं ४ माझा प्रेमळ प्रभू तो दास सुखी मी हर्षतों कां करूं घोर? धन्य मी ! करी उल्हास नेहमीं