येशूचे नाम गोड फ़ार दीनांना लागते

मराठी

येशूचे नाम गोड फ़ार दीनांना लागते ते दु:खे भये अनिवार करिते त्या नावे शांति भरती अत्यंत समाधान भुकेले तृप्ती पावती दीनां मिळे कल्याण येशू हा माझ्या प्रार्थना देवाला ऐकवी दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी येशू हा माझा मित्र जाण पाठिंबा मेंढपाळ गुरु उपाध्या दयावान व राजाही तेजाळ हे प्रभु माझी स्त्वने अत्यंत हलकी गाईन स्वर्गी गायने दूतांच्या सारिखी आताही तुझी ममता सांगे मी सकळां अंतरी भरी शांतता मरतां दयाळा