ध्रु. राजा येशू आला राजा येशू आला

मराठी

ध्रु. राजा येशू आला राजा येशू आला सैतानाला जिंकायाला राजा येशू आला १. घालवुनी पापे आणि दु:खे घोर पूर्ण शांती द्यावयाला राजा येशु आला २. आनंदी आनंद झालो पापमुक्त मला शुद्ध करायला राजा येशु आला ३. वधस्तंभावरी प्राण देत झाला जगताचा त्राता झाला राजा येशु आला ४. राजांचा तो राजा प्रभूंचा तो प्रभू बोला सारे जय जय बोला राजा येशु आला