१ राजाचे आगमन

मराठी

१ राजाचे आगमन ह्या वेळीं स्मरुनी, भेटीचें गाऊं या गायन हर्षानें प्रार्थुनी २ अनादि पुत्र तो घेऊनिया शरीर दासाचें रुप घेई तो कराया दासोद्धार ३ सियोनकन्ये, लीन राजाला अंगीकार, न करी मनें श्रद्धाहीन शांतीचा तूं धिक्कार ४ तो न्याय कराया लवकरी येईल, आकाशीं राज्य भोगाया स्वभक्‍तां मिळवील ५ जुनें मनुष्यपण तत्कर्मे हीं टाकून, त्या दिनापूर्वी जें नूतन तें लेऊं, हो, जपून ६ पुत्राला द्या सन्मान तो प्रिय तारणार पिता आत्माही त्यासमान त्यांचे स्मरा आभार