१ रात्रीं खिलारें राखितां

मराठी

१ रात्रीं खिलारें राखितां मेंढके बसले, तै दूत आला, भोंवता तेज चकाकलें २ ते अति भितां त्यासमोर, तो बोले प्रेमवान जेणें सर्वास हर्ष थोर तें ऐका वर्तमान ३ हो दाविदाच्या नगरीं त्याच्या वंशांतला, जो ख्रिस्त त्राता ईश्वरी, तो आज जन्मला ४ बाळाची, जाणा हीच खूण तुम्हांसी आढळे, तें बाळंत्यानें गुंडाळून गव्हाणीं ठेविलें ! ५ तै दूतसैन्य अकस्मातें दृष्टिस पडलें, देवाला स्तवूनिया गात, तें ऐसें बोललें, ६ परम उंची परात्पर, तयाला असो मान, पृथ्वींत शांति, जनांवर अत्यंत कृपादान