वंदा, वंदा, तारक प्रभु येशूला

मराठी

वंदा, वंदा, तारक प्रभु येशूला गा, हे पृथ्वी अतुल हे प्रीती वंदा, वंदा, स्वर्गीय दूत तयाला द्या हो नामा महिमा अती मेंढपाळासम रक्षी आम्हांला स्वहस्ती तो नेहमी धरूनी वंदा, वंदा, तयाचि किर्ती सांगूनी वंदा, वंदा हर्षाने गाउनी- ध्रु वंदा, वंदा, तारक प्रभु येशूला साही दु:खे मरण पापास्तव तोची आहे सतत तारणआशा वंदा, वंदा, येशू उद्धरास्तव गेले पाप करा करा प्रशंसा प्रीती त्याची अमित पाहुनी वंदा, वंदा, तारक प्रभु येशूला आकाशांनो जयकारा करा राज्य सार्वकालिक मिळे येशूला घाला घाला मुगुट त्या शिरा येशू येई विजयि या जगाला शक्ती किर्ती जाई तै व्यापुनी