वर्ष नवें आलें,

मराठी

वर्ष नवें आलें, कारण हर्षाला झालें- ध्रु बंधुभगिनींची सेवा करितां वर्ष एक गेलें ख्रिस्तिपणाचें तेज पाडुनी दूर तमा नेलें देवाजीचें राज्य ह्या जगीं वृध्दिंगत केलें माझी इच्छा, इच्छा प्रभुची, व्दैत असें नुरलें येथे तेथें आज उद्यां हें एकतेस आलें ख्रिस्ताचा मज अस्त न पळहीं हें सुख अनुभवलें