१ होईल वृष्टी कृपेची

मराठी

१ होईल वृष्टी कृपेची ईशप्रेमोक्ती असे, तेणें तुष्टी पुष्टि यांची वृद्धि जगीं होतसे ध्रु. वृष्टी कृपेची ! वृष्टि कृपेची हवी बिंदु येताती, दयेची आम्हां सुवृष्टी हवी २ होईल वृष्टि कृपेची स्फूर्तिदायी, थोर ती ये झोड भारी वारीची, खिंड्याटेकाडांत ती ३ होईल वृष्टी कृपेची देवा, करावी आतां स्वोक्ति करा स्वामी साची, द्या हर्ष अपेक्षितां ४ होईल वृष्टी कृपेची साधा प्रभू इष्ट काज, ऐसी विनंती ख्रिस्ताचे नावें करितसुं आज