विमलात्मा ओतीं, देवा

मराठी

विमलात्मा ओतीं, देवा ख्रिस्ताकरितां- ध्रु अग्नितुल्य रसना जरी आतां न ये आम्हांवरी तथापि तूं चित्तीं भरीं आत्मा पुरता, देवा त्यास भरुनीयां मनीं वारीं अधें सारीं झणी ख्रिस्तामधीं जगवुनी देई सौख्यता, देवा ख्रिस्त सत्य जाणावया तेवीं तुझी प्रीती दया, वचनातें समजावया आत्मा दे आतां, देवा त्याच्या सहवासें अती आशा खरी मनाप्रती दु:खांतही आधार ती तैसीं मरतां, देवा