शांत काळ! दिव्य बाळ!

मराठी

शांत काळ! दिव्य बाळ! भीषण अंधकार गव्हानीत येशूबाळ शोभवी जगा तेजाळ घे विश्रांति शांत ! शांतिचा राजा प्रशांत शांत काळ ! दिव्य बाळ ! अंधकार प्रकाशात दूर होई त्या क्षणात दूत येती अनंदात हालेलूया गात ! शांतिचा राजा प्रशांत शांत काळ ! दिव्य बाळ ! पृथ्वी स्वर्ग आनंदात दिव्यदूत गाणी गात जाउनी तै मेंढपाळ ख्रिस्त वंदिला, शांतिचा राजा प्रशांत शांत काळ ! दिव्य बाळ ! बेथलेहेमी येशू बाळ मागी लोक वाहुनी अर्पणे त्या चरणी भेटती नृपास शांतिचा राजा प्राशांत शांत काळ ! दिव्य बाळ ! यो प्रकाश मन्मनात दिव्य गाणी गाऊ या येशूराजा वानु या हालेलूया गात शांतिचा राजा प्रशांत