शिष्यही गणाया नाहीं

मराठी

शिष्यही गणाया नाहीं योग्य जो तयाला मित्र तूं जिवाचा म्हणशी उदारा दयाला !- ध्रु धूल जी तुझ्या पायांची तिच्याही कणाची योग्यता न माझी, सदया प्रभो, दुर्बलाची ! साउली न घ्यावी ज्याची तुवां या खलाला प्रेमानें घ्यावें स्कंधी ! काय म्हणूं ह्याला ! दिव्य वैभवाचें नाहीं मोल वाटलें ना ? मर्त्य देह माझ्यासाठीं मान्य जाहला ना ? ठोकिले खिळे देहीं हें सर्व सोसलें ना ? काय नांव देऊं न कळे ह्या तुझ्याच शीला !