संपूर्ण जगादेखता

मराठी

१. संपूर्ण जगादेखता ख्रिस्ताला धरी मी त्याची वार्ता सांगता लज्जा न मानी मी ध्रु. ख्रिस्तराये मला पामरा तारिले दिव्य तेज मम मनी घातले दृष्टी विश्वासे हृदयी पावलो आनंदी सुखी मी जाहलो २. हे नाम येशू गोड फार तो माझा पूर्णाश्रय नाही मला तो टाकणार त्या ठायी मी निर्भय ३. तया जीवात्मा सोपिला सदा तो रक्षणार तो न्यायकाळीही मला नाहीच सोडणार ४. मलाही तो देवासमोर प्रेमाने पत्करील स्वर्गात माझा हर्ष थोर अक्षय वाढवील