सानथोर हीं मुलीमुलें,

मराठी

सानथोर हीं मुलीमुलें, प्रभुच्या बागेंतील फुलें- ध्रु प्रभुचीं तीं बहु आवडतीं त्यांजवरी करि तो प्रीती प्रभु येशूचा ह्या भूवरचा बाग फुलांचा रोपें त्यांतिल मुलीमुलें टवटवलेलीं रम्य फुले मुलें मोगरे, जाइ मुली, जीवन प्रभुजी त्यां घाली बाग फुलांचा, मधुर फळांचा प्रभु माळ्याचा आज्ञांकित हीं मुलीमुलें, एदेनांतिल दिव्य फुलें हन्नेनें निज बाळाला ईशा नेउनि वाहिला शमुवेलाला ईशें अपुला सेवक केला याजक नांवा मिळविलें परमेशाला तोपविलें मुलीमुलांनों या हो या, प्रभुराया गाणें गाया, अनन्य भावें सेवक व्हावें, गौरव द्यावें देवाला निजमधुबोलें, शमुवेलानें शिकविलें