सिद्धी मेजाची झाली का ?

मराठी

सिद्धी मेजाची झाली का ? पेला वाही का भरुनी ? देवा, वाही स्वबालका, पाहोत प्रेमा चाखुनी ही मेजवानी ख्रिस्ताची, वाढी स्वरक्‍त-मांसाहार किती हो धन्यता त्यांची, जे तीत होती भागीदार ! कळेना मोल त्यापुढे मिष्टान्न हे का मांडीती ? बाळांसी यांचे वावडे ? की, त्या कोणी मनाविती ? निमंत्रितांनी अन्नाचा करावा श्रद्धेने सत्कार, तू देशी कळावा साचा मुक्‍तीचा हा तया विसार पितापुत्रात्म्याची स्तुती भूस्वर्गी सर्व गाताती, मनुष्ये दूत-पंगती अंहर्निशी गावोत ती