१ सैनिकांनो, धैर्य धरा,

मराठी

१ सैनिकांनो, धैर्य धरा, युद्धिं राहा स्थिर, पाहा पुढें चालणारा ख्रिस्त महावीर ध्रु. जयजयकार करा यश मिळतें, साह्यकारी प्रभु ख्रिस्त आम्हां संगातें २ सर्वदा असंख्य वैरी हल्ला करिती, बाण येती आम्हांवरी शूर पडती ३ तो वैर्‍यांचा सरदार साच बलवान ख्रिस्त परी तारणार, कैवारी महान ४ सैनिकांनो कां दबावें ? झुंजा त्यांजशीं, शेवटास युद्ध न्यावें, मिळा ख्रिस्ताशीं