हर्ष पूर्ण जाहला

मराठी

हर्ष पूर्ण जाहला हालेल्या! आज ख्रिस्त उठला हालेलूया! दुःखे सोसूनी अपार हालेलूया! त्याने साधिला उद्धार हालेलूया! ख्रिस्त राजा वैभवी हालेलूया! त्याची संस्तुती गावी हालेलूया! त्याने पाप्यां तारीले हालेलूया! क्रूस थडे भोगीले हालेलूया! त्याने पूर्ण खंडणी हालेल्या केली दुःखे साहुनी हालेलूया! आता स्वर्गी तो पती हालेलूया! .. त्याला दूत स्तवीती हालेलूया!