ही कालतरूवर नूतन कलिका फुलली,

मराठी

ही कालतरूवर नूतन कलिका फुलली, ही दिसे रसें थबथबली, पाहतां वाट हो कसली ? माधुरी, घ्या खरी, म्लान जों न जाहली ही कालतरूवर नूतन कलिका फुलली, ही कुणा विषारी दिसली, प्रभुकरीं तरी ती रमली, ही सुधा ! या मुधा, भ्रांति नाहिं चांगली ही कालतरूवर नूतन कलिका फुलली, ही असे खरोखर आपुली, ईश्वरें आपणां दिधली, चिंतुनी, त्या मनीं, व्हा इच्यांतले अली