१ हे बापा करि क्षमा,

मराठी

१ हे बापा करि क्षमा, कळेना त्यांजला, हे येशू खिळतांना पित्याशीं बोलला २ न लावी बोल त्यांना जरी ते घातकी, प्रार्थुनि मागे क्षमा तत्प्रेमा इतकी ३ ती क्षमा मजसाठीं, ती प्रिय विनंती, मीही तैसाचि दिषी त्या मला लागती ४ उला मीं क्रूसीं दिलें कठिण्यें, गर्व थोर मीं ठोकिले, हे त्रात्या, ते खिळे अति घोर ५ मी तुझी वाणी सौम्य धिक्कारीं आजवर न कळतां हें केलें मलाहि क्षमा कर ६ दयानिधे हे येशू तूं दिव्य प्रेमागार अज्ञानी तुझे वैरी, प्रेमें तयांना तार