हे बापा यांस क्षमा दे कृपा करी

मराठी

हे बापा यांस क्षमा दे कृपा करी करिति कृती काय त्यांस न कळे जरी- ध्रु बोलुनिया ख्रिस्त प्रभु प्रार्थना करी निंदिलेंही सकलांनीं त्याजला जरी परिहि वदे शब्द गोड मधुर वैखरी सदया, राया, ध्याया, सकलांना पाप्यांना, दीन जनां, प्रेम सागरीं घोर जरी कुणि पापी त्यास उद्धरी नैराश्यीं जरि पडला त्यास सत्वरी बसवी नित्य आशेच्या विमल गिरीवरी प्रीती, भक्‍ती, नीती, मज कळली अनुभवली, ती दिसली, त्या क्रुसावरी क्षेम, दया पूर्ण वसत प्रभु हृदंतरी क्रूसखांबि दाउनि ती जगत उद्धरी दिव्य तुझी प्रीतीही निस्तुला खरी ध्याऊं, सेवूं, गाऊं तव नामा सुखधामा, विश्रामा, भाव तुजवरी