हें साक्रमेंत आम्हां

मराठी

हें साक्रमेंत आम्हां प्रिय फार येशूराया त्यामाजिं क्रूस तूझा दृष्टीस ना दिसे या परि मारिला क्रूसीं जो बळि त्यांत अर्पियेला विश्वास ठाम माझा कीं तो मदर्थ मेला हें साक्रमेंत आम्हां प्रिय फार येशुराया त्यामाजीं देह तूझा दृष्टीस ना दिसे या परि देह आमुचें तो इह होत दिव्य अन्न जो ताडिला, खिळियला, मजसाठीं हो विदीर्ण हें साक्रमेंत आम्हां प्रिय फार येशूराया त्यामाजि रक्त तूझें दृष्टिस ना दिसे या प्याल्यावरी दिसेची परि रक्‍तवर्ण लाली जें काल्वरीवरोनी गळतें मदर्थ खालीं हें साक्रमेंत आम्हां प्रिय फार येशूराया त्यामाजिं रुप तुझे दृष्टीस ना दिसे या शिरकुक्षिकरपदादी दिसती तशीच मुद्रा कंटककिरीट भाळीं व्रणही दयासमुद्रा कर्त्या मदीय येशी देवा जधीं जगीं या तव ईश्वरत्व कोण नच ये दिसून राया तरि विद्यमान मजसह असतोस साक्रमेंतीं तूं देव तूं मनुष्यहि, ही कोण गूढ शक्‍ती