१ हो स्वर्गीचे गायकगण,

मराठी

१ हो स्वर्गीचे गायकगण, वर्णाया पास्खजय मधुर स्वरें गा गायन, हर्षा हो अतिशय २ कीं सर्पमस्तका ठेंचून तोडुनी स्वबंधन यहुदासिंह तो गर्जून उठवी मृतजन ३ आज्ञा ऐकूनी अधोलोक सोडी हो बंदीवान, येशूमागूनी सैन्य चोख, ते येती जयवान ४ तो ख्रिस्त विजयश्रीमान त्याला पूर्णाधिकार, भूस्वर्गी संत भक्‍तिमान करोत नमस्कार ५ प्रभूला आम्हीं स्तवूनी ही कृपा मागतों आम्हांला स्वर्गी नेवोनी सर्वथा राखी तो ६ पित्याला असो पूर्ण मान, असो पुत्रा दयाळ, पवित्र आत्म्या बलवान तो असो सर्वकाळ, हालेलूया !